ही एक अंधश्रद्धा आहे की यामागे आणखी कोणतं कारण आहे ते जाणून घेऊ.
अनेकदा आपला विश्वास नसला तरी आपल्या ग्रुपमध्ये अशी एक ना एक व्यक्ती असते जिचा या सर्वांवर विश्वास असतो.
भारतात काळ्या मांजरीने आपला रस्ता ओलांडल्यास आपण एकतर गाडी थांबवतो किंवा मागे घेतो.
काळा रंग हा शनीचा रंग आहे.
मांजरीला राहूचं वाहन मानलं जातं.
काळी मांजर तुमच्या रस्ता ओलांडत असेल तर शनी आणि राहू दोघांच्या क्रोधाचा संकेत मानला जातो.
असं मानलं जातं की, मांजर दिसल्यानंतर काही वेळ एकाच ठिकाणी शांतपणे थांबल्यास देवतांचा क्रोध शांत होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.