वैदिक पंचांगानुसार, आज 24 जून 2025 चा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांनो आज आपले मत प्रदर्शित करताना न्याय बाजू समजावून घेऊन बोलणे हितावह ठरेल

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus )

वृषभ राशीच्या लोकांनो आज सत्य हे कधी ना कधीतरी उजेडात येते, याची जाणीव ठेवून त्याप्रमाणे वर्तन ठेवलेत तर पुढच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनो आज व्यवसाय नोकरीत, तुमच्या कल्पना अफलातून असतील, त्यासाठी वाहवा मिळेल.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनो महिला आपली बौद्धिक बाजू जगासमोर मांडतील, त्यामुळे त्यांचे नवीन पैलू जगाला दिसतील

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांनो ज्यामध्ये पैसा कमवायचा आहे, असे शिक्षण विद्यार्थ्यांना फायदेशीर पडेल, त्याप्रमाणे नियोजन करावे

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांनो आज घरातील धार्मिक समारंभात उत्साहाने भाग घ्याल, नोकरीमध्ये मनाच्या जागा मिळतील

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांनो आज सगळीकडे तुमच्याशिवाय इतरांचे पान हरणार नाही, त्यामुळे शारीरिक दगदग खूप होईल.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांनो तुमच्या शांत व्यक्तिमत्त्वाचा फायदा घेतला जाईल, कोणत्याही परिस्थितीत संघर्षा न करता आणि त्या परिस्थितीत सुखा समाधानाने राहाल

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांनो आज आरोग्य चांगले राहील, बौद्धिक गोष्टींचे जबरदस्त आकर्षण राहील

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो आज सामाजिक कार्य होतील, अधिकारी वर्गाला उत्तम काळ महिलांच्या नवीन ओळखी होतील

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांनो आज परदेश गमनाचे योग संभवतात, त्यासाठी खटपट करायला चांगला दिवस

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये छानशी खरेदी कराल, घरात मंगलकार्य ठरल्यामुळे त्यात वेळ चांगला जाईल

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)