वैदिक पंचांगानुसार, आज 20 जून 2025 सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJAH

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांनो आज विद्यार्थी नवीन कल्पना विश्वात रमतील, तुम्हाला दुसऱ्याबद्दल वाटणारी अनुकंपा वाजवीपेक्षा जरा जास्तच असेल.

Image Source: ABP MAJAH

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये जवळच्या नात्यातील व्यक्तींकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.

Image Source: ABP MAJAH

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्या अविवाहारी विचारांमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, कामाचे नियोजन व्यवस्थित करा.

Image Source: ABP MAJAH

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनो कोणते काम अगोदर करायला हवे, किंवा नंतर करायला हवे, याचा विचार केल्यास यश मिळेल.

Image Source: ABP MAJAH

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांनो आज भाऊबंदकीचे प्रश्न डोके वर काढतील, वैवाहिक जीवनात थोडे त्रास सहन करावे लागतील.

Image Source: ABP MAJAH

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांनो आज संततीबाबत कानावर आलेली एखादी बातमी बेचैन करून जाईल, अचानक लांब प्रवासाला जावे लागेल.

Image Source: ABP MAJAH

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांनो आज आज प्रकृती सांभाळावी लागेल, परंतु तुम्हाला मानसन्मान मिळणाऱ्या घटनाही घडतील.

Image Source: ABP MAJAH

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांनी सकारात्मक धोरण स्वीकारावे, तुमच्या दूरदर्शीपणाचा फायदा तुम्हाला होणार आहे

Image Source: ABP MAJAH

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांनो आज जवळच्या प्रवासाचे योग येतील, एरव्हीपेक्षा जरा जास्तच व्यवहारी बनाल.

Image Source: ABP MAJAH

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात आवश्यक त्या व्यक्तींच्या गाठी भेटी पडून बरेच प्रश्न मार्गी लागतील.

Image Source: ABP MAJAH

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना मदतीचा हात द्याल, प्रसंगी स्वतःचा वेळ आणि पैसाही खर्च कराल

Image Source: ABP MAJAH

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांनो आज पैशाचे प्रश्न सुटतील, परंतु कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त काम ओळखण्याच्या प्रयत्नांचा शॉर्टकट ग्राहकांना पसंत पडणार नाही.

Image Source: ABP MAJAH

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJAH