आज फार तर्कवितर्क लावू नयेत, तरच तुम्ही सुखी राहाल आणि दुसऱ्यांना सुखी कराल. नवी संधी दार ठोठावेल.
आळस आराम आणि चैन यामध्ये वेळ दवडू नका नाहीतर यश मिळणार नाही.
नवीन विचारांचे स्वागत करण्यातच तुमचे हित दडलेले आहे. विद्यार्थ्यांनी ध्येयावर प्रेम करून कर्तव्यात तत्परता दाखवावी.
फार काळजी करू नये. महिला हसतमुख राहून वेळ आनंदात घालवतील.
संततीच्या बाबतीत एखादी चांगली बातमी कानावर येईल. कलाकारांची कला बहरेल.
आज नावलौकिक मिळेल. घर टापटीप ठेवण्यात येथे उत्तम सुधारणा करण्यात वेळ आणि पैसा खर्च कराल.
आज हातून कष्ट जास्त होणार नाहीत. प्रकृती स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे.
आज बऱ्याच लोकांची मने जिंकाल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
महिला अल्प संतुष्ट राहतील. ठराविक चाकोरीतून जाण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या बोलण्याची इच्छा लोकांवर पडेल. गप्पांच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकाल.
नोकरी व्यवसायात तुमच्या बौद्धिकतेचा खूपच उपयोग होईल. भरपूर मित्रमंडळी भेटतील.
शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. वरिष्ठांची मर्जी संपादन होईल.