मेष रास (Aries)

किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण तुम्ही या आजारांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आजार वाढू शकतात.

वृषभ रास (Taurus)

डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका.

मिथुन रास (Gemini)

जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा कमी मेहनत केली तर तुम्हाला यश मिळणार नाही. जर तुम्हाला एकटं वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या भावंडांसोबत वेळ घालवू शकता.

कर्क रास (Cancer)

तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही चढउतार जाणवू शकतात. किरकोळ समस्यांमुळेही तुम्ही चिंतेत पडू शकता.

सिंह रास (Leo)

आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, टेन्शन फ्री होण्यासाठी मॉर्निंग वॉक, योगा करा, यामुळे तुम्हाला नक्कीच फायदे होतील.

कन्या रास (Virgo)

झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.

तूळ रास (Libra)

तुमचं आरोग्य चांगलं राहील. फक्त तब्येतीच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा तब्येत बिघडू शकते.

वृश्चिक रास (Scorpio)

आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.

धनु रास (Sagittarius)

तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काम करू नये.

मकर रास (Capricorn)

तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो.

कुंभ (Aquarius)

महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

मीन (Pisces)

आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या. वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणा होऊ शकतो.

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)