यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही बहिणीसाठी खास फायनान्शिअल गिफ्ट देऊ शकता.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही बहिणीला ओवाळणी म्हणून तिच्या भविष्यात उपयोगी होईल असे गिफ्ट देऊ शकता.

Image Source: pexels

मागील काही काळापासून गिफ्ट म्हणून फायनान्शिअल गिफ्ट्स देण्याची पद्धत सुरू होत असल्याचे चित्र आहे.

Image Source: pexels

सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP)

तुम्ही तुमच्या बहिणीसाठी म्युच्युअल फंड एसआयपी सुरू करू शकता. बहिणीच्या खात्यात नियमित मासिक योगदान देऊन तुम्ही SIP सुरू करू शकता.

Image Source: pexels

गोल्डन बाँड

तुमच्या बहिणीसाठी गोल्ड सॉवरेन बाँड्स किंवा गोल्ड सेव्हिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक करुन देऊ शकता.

Image Source: pexels

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

बहिणीसाठी PPF मध्ये गुंतवणूक करू शकता. यामुळे त्यांना निवृत्तीनंतर मदत होऊ शकते.

Image Source: pexels

मुदत ठेव (FD)

तुम्ही तुमच्या बहिणीसाठी FD मध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही बँकेत किंवा AAA रेट केलेल्या कॉर्पोरेटमध्ये मुदत ठेव मिळवू शकता.

Image Source: pexels

शेअर मार्केट

तुम्ही चांगल्या ब्लूचिप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता.

Image Source: pexels

विमा पॉलिसी

तुम्ही तुमच्या बहिणीसाठी वैयक्तिक विमा घेऊ शकता. तुम्ही त्यांच्यासाठी एलआयसी अथवा इतर कंपन्यांकडून विमा पॉलिसी घेऊ शकता.

Image Source: pexels

पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक योजना

पोस्ट ऑफिस कार्यालयात गुंतवणूक, बचतीच्या योजना आहेत. महिलांसाठी काही खास योजना असतात.

Image Source: pexels