मेष (Aries)

तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतातपण तुम्ही या आजारांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आजार वाढू शकतात.

वृषभ (Taurus)

तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास होणार नाही.

मिथुन (Gemini)

जे वैद्यकीय क्षेत्रात जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांना त्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक वाढवावं लागेल.

कर्क (Cancer)

तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही चढउतार जाणवू शकतात. किरकोळ समस्यांमुळेही तुम्ही चिंतेत पडू शकता.

सिंह (Leo)

आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, टेन्शन फ्री होण्यासाठी मॉर्निंग वॉक, योगा करा, यामुळे तुम्हाला नक्कीच फायदे होतील.

कन्या (Virgo)

झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.

तूळ (Libra)

आज तुमची तब्येत बिघडू शकते. तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल.

वृश्चिक (Scorpio)

आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.

धनु (Sagittarius)

आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

मकर (Capricorn)

आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका.

कुंभ (Aquarius)

आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या.

मीन (Pisces)

तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यान करावा आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं.