वडिलोपार्जित संपत्ती विषयी मोह ठेवणार नाही. कुटुंबामध्ये आपल्या गरजा कमी कशा ठेवाव्यात याचे महत्त्व पटवून द्याल.
आज जरा जास्तच गंभीर बनाल. महिलांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल.
आज तुमच्या कलेला प्रोत्साहन मिळेल. राजकारणामध्ये प्रभाव पाडण्यासाठी उत्तम दिवस आहे.
मानापमानाच्या कल्पना जरा जास्तच तीव्र होतील. स्वतःची छाप इतरांवर पटकन पाडाल.
आपले विचार लोकांवर लादण्यात यशस्वी ठराल. स्थावर इस्टेटसंबंधीचे प्रश्न सुटतील.
नोकरी व्यवसायात अनेक कामे चिकाटीने पूर्ण कराल. आर्थिक बाजूही सुधारेल.
अत्यंत विचार करून व्यवहाराला धरून पैसा खर्च कराल. मोजके बोलून शांत राहून आपली कामे साध्य कराल.
कोळसा लोखंडी सामानाचा व्यापार करणाऱ्यांना पैसा मिळेल. वैवाहिक जीवनात गैरसमज होण्याची शक्यता आहे.
लोकांशी सुसंवाद साधण्याचा उपयोग नोकरी-व्यवसायात उत्तम होणार आहे. परदेशगमनाच्या संधी मिळतील.
ज्यांचा परदेशी कंपन्याशी व्यवहार चालतो, अशा व्यक्तींना नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. भावंडांशी मतभेद होतील.
आज परिस्थिती आहे तशी स्वीकारणे भाग पडेल. अति भावनाप्रधानता टाळणे इष्ट ठरेल.
मनातील गुप्त भावना इतरांसमोर व्यक्त करू नयेत. काहीतरी नवनिर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती मात्र थोडी कमी पडेल.