मेष रास (Aries)

आज तुमच्या चालण्या बोलण्यात एक प्रकारचा रुबाब दिसेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक होईल.

वृषभ रास (Taurus)

व्यवसाय नोकरीत अनेक संधी तुमची वाट पाहत असतील.

मिथुन रास (Gemini)

आर्थिक घडी उत्तम बसेल.

कर्क रास (Cancer)

तुमच्या कामामध्ये काहीतरी वेगळेपणा दिसेल. नियोजन पूर्ण लोकोपयोगी कामे हातून होतील.

सिंह रास (Leo)

एखाद्या गोष्टीची व्यवस्थित मांडणी कराल आणि तिचे योग्य पद्धतीने सादरीकरण कराल.

कन्या रास (Virgo)

आज जरा जास्त दगदग आणि कष्ट करावे लागतील.

तूळ रास (Libra)

परदेश गमनासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे

वृश्चिक रास (Scorpio)

अर्धांगवायू व वातविकार हा त्रास असणाऱ्यांनी डॉक्टरी सल्ला घेणे आवश्यक आहे.

धनु रास (Sagittarius)

घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरेल.

मकर रास (Capricorn)

वाहने जपून चालवा तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील.

कुंभ रास (Aquarius)

तुमच्या कर्तुत्वाला झळाळी देणारा दिवस आहे. व्यवसाय नोकरीमध्ये कामाचा फडशा पाडाल.

मीन रास (Pisces)

आर्थिक आणि सामाजिक स्तरावर फायदा होईल. कर्तुत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील.