वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या फूलाला विशेष महत्त्व आहे.
आर्थिक संकट दूर करण्यासाठी आणि आर्थिक लाभासाठी जास्वंदीच्या फूलाचा वापर होतो.
शुक्रवारी गणपती बाप्पा आणि देवी दुर्गा यांचं ध्यान करा.
यानंतर पाच जास्वंदीची फुलं घेऊन आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. हे किमान 7 दिवस करा.
सूर्यदेवाची पूजा करताना जास्वंदीचं फूल अर्पण करावं.
जास्वंदीचं फूल तांब्याच्या कलशात ठेवावं, त्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करावं.
जास्वंदीचं फूल पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावं.
यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता निर्माण होते. परंतु जास्वंदीची रोपं कधी सुकू नयेत, हे लक्षात ठेवा.
पती-पत्नीमधील गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही उशीखाली जास्वंदीचं फूल घेऊन झोपावं यामुळे तुमच्यामध्ये प्रेमाची भावना पसरेल.
जर तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवी असेल तर तुम्ही देवी लक्ष्मीला जास्वंदीच्या फुलांसह साखरेचा प्रसाद द्यावा.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)