कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेले लोक ओव्हरस्मार्ट असतात.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.
मूलांक 1 चे लोक हे स्वभावाने हट्टी असतात.
या जन्मतारखेचे लोक नेहमी स्वत:चंच म्हणणं खरं करतात.
समोरच्याचं ऐकून घेण्याची ताकद त्यांच्यात नसते.
ते स्वत:लाच शहाणे समजतात आणि आपल्यालाच सर्वकाही माहीत असल्यासारखं ते वावरतात.
हे लोक अतिशय शिस्तबद्ध असतात आणि या गुणामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात.
या जन्मतारखेचे लोक त्यांच्या मेहनतीने आणि क्षमतेने सरकारी नोकरी मिळवण्यात यशस्वी होतात आणि त्यांच्या टीमचं नेतृत्व देखील करतात.
या मूलांकाचे काही लोक चांगले नेतेही बनतात.
हे लोक इलेक्ट्रॉनिक, फॉरेन कंपनी, संशोधन कार्य, विद्युत संबंधित व्यवसाय आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ते काम करतात आणि तिथे प्रगती साधतात.