गरुड पुराणात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे माणसाचं जीवन सार्थकी लागतं.
जर तुम्ही गरुड पुराणात सांगितल्या गेलेल्या गोष्टींचं पालन केलं तर पैशाशी संबंधित समस्या नक्कीच दूर होतील.
जे आपल्या कमाईचा काही भाग दान करतात आणि धार्मिक कार्यात खर्च करतात, त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
जे लोक आपली संपत्ती दाखवत नाहीत, तिचा दिखावा करत नाहीत, त्यांच्या घरात देवी लक्ष्मी नेहमी वास करते. धनाची बढाई मारणाऱ्यांवर लक्ष्मी कोपते.
उधार घेतलेले पैसे नेहमी पूर्ण फेडले पाहिजेत. धनाचा लोभ, फसवणूक किंवा चोरी करणाऱ्यांसोबत लक्ष्मी कधीच राहत नाही.
जे लोक घाणेरडे कपडे घालतात, दात घासत नाहीत, वाटेल ते खातात, बोलताना कठोर शब्द वापरतात आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतात त्यांच्या घरी लक्ष्मी नांदत नाही.
नेहमी स्वच्छ राहिलं पाहिजे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी बनू शकतात. विचारांमध्ये शुद्धता आणि वाणीत संयम ठेवणाऱ्यांवर देवी लक्ष्मी नेहमी कृपा करते.
ज्या घरात रोज तुळशीची पूजा केली जाते, त्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो.
त्यांना भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच अशा घरात कधीही पैशाची, धनाची कमतरता भासत नाही.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)