वास्तुशास्त्र सकारात्मकतेला आकर्षित करते ज्यामुळे आर्थिक लाभाचा परिपूर्ण प्रवाह निर्माण होतो.
तुमच्या जीवनात भरपूर पैसा आकर्षित करण्यासाठी या वस्तु टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.
भगवान कुबेर हे समृद्धी आणि भाग्याचे प्रतीक मानले जाते. तुमच्या प्रार्थना क्षेत्रामध्ये भगवान कुबेर यांचे यंत्र किंवा चित्र ठेऊ शकता.
वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी-कुबेर यांचे चित्र घरच्या प्रवेशद्वाराजवळ असल्याने धनाची कमतरता भासत नाही.
घरात मनी प्लांट ठेवल्याने आर्थिक प्रगतीतील अडथळे दूर होतात आणि कामईचे अनेक मार्ग मोकळे होतात.
लाफिंग बुद्ध त्यांच्या आनंदी आणि उत्साही स्वभावसाठी ओळखले जातात. लाफिंग बुद्धाचा पुतळा प्रवेशद्वारकडे किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून ठेवल्यास घरात धन आणि सौभाग्य येते.
वास्तुशास्त्रानुसार घरात कासव ठेवल्याने सौभाग्य प्राप्त होते.
कासव नेहमी उत्तर दिशेला ठेवावे यामुळे आर्थिक लाभ मिळतो आणि व्यवसायात यश मिळते.
ऐरावत हत्तीवर स्वार झालेल्या देवी लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मकता येते.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)