तुमच्या तडफदार व्यक्तिमत्त्वाला सखोल चिंतनाची साथ मिळेल.
आज नवीन कल्पनांना जन्म द्याल. बौद्धिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करू शकाल.
व्यापारी वर्गाने सरकारी नियम आणि कायदे यांचे बंधन काटेकोरपणे करावे.
नवीन कामे स्वीकारताना त्यातील तांत्रिक गोष्टींचा अंदाज घ्यावा लागेल.
विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये. आर्थिक बाबतीत सावध राहावे.
स्वतःवर फार विश्वास न ठेवता योग्य दिशेने काम करायला हवे.
कुठेही अंधविश्वास न ठेवता पैशाचा अति लोभ आज टाळावा लागेल.
आज कष्ट करण्यात थोडे कमी पडाल. आळशीपणा वाढेल.
अध्यात्मिक उन्नती साधाल. घरामध्ये सर्वांचा मूड मौजमजा करण्याचा असेल.
आज ऋण काढून सण साजरा न करणे चांगले राहील. घरात किंवा बाहेर कोणताही निर्णय पटकन घेऊ शकणार नाही.
अडचणीतून मार्ग काढण्यासाठी इतरांना न पडणारा निर्णय अचानक घेऊन टाकाल.
साहित्य निर्मिती, कला आणि विज्ञानामधील नवनवीन प्रयोग कराल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.