वास्तुशास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.
वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी तिजोरीत ठेवल्यास अडकलेले पैसे मिळण्यास मदत होते आणि जीवनात पैशांची कमतरता कधीच भासत नाही.
सनातन धर्मात हळदीचा उपयोग शुभ आणि मंगलमय कार्यासाठी केला जातो.
तिजोरीत हळदीचा एक गोळा ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील सदस्यांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते.
जर तुम्हाला आयुष्यात पैशांशी संबंधित समस्या येत असतील तर पिंपळाच्या पानावर लाल शेंदूर लावून ओम लिहा. यानंतर ते तिजोरीत ठेवा.
हा उपाय सलग पाच शनिवारी करा. असे म्हणतात की, हा उपाय केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात.
जर पैसे तुमच्या तिजोरीत राहत नसतील तर याचं सर्वात मोठं कारण तिजोरीतील रंगदेखील असू शकतो.
तिजोरीच्या आतील रंग लाल असावा असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार तिजोरीचा रंग लाल असेल तर पैसा खेळू लागतो.
तिजोरीत लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार तिजोरीजवळ झाडू ठेवण्यास मनाई आहे. असे मानले जाते की यामुळे घरामध्ये गरिबी येते.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)