साधारणपणे एक किलो चंदनाच्या लाकडाची किंमत सात ते आठ हजार रुपयेपर्यंत असते. पण चंदन हे सर्वात महागड लाकूड नाही.
चंदनापेक्षाही महाग एक लाकूड आहे, या एक किलो लाकडाची किंमत आठ हजार पौंड म्हणजेच सुमारे आठ लाख रुपये आहे.
आफ्रिकन ब्लॅकवूड प्रकाराचं झाड जगातील दुर्मिळ मानलं जातं. त्यामुळेच त्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत.
इतर झाडांच्या तुलनेत ही झाडे खूपच कमी प्रमाणात आहेत, त्यामुळेच त्यांना जास्त मागणी आहे.