सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनं यूएस ओपन 2023 मध्ये विजेतेपद पटकावलंय.

न्यूयॉर्कच्या आर्थर अॅशे स्टेडियमवरील अंतिम सामन्यात जोकोविचनं मेदवेदेवचा सरळ सेटमध्ये पराभव केलाय

नोव्हाक जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे

या विजयासह जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरलाय.

जोकोविचनं पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला.

दुसऱ्या सेटसाठी जोकोविच आणि रशियाच्या मेदवेदेव यांच्यात एक तास 44 मिनिटं चुरशीची लढत झाली.

एक तास 44 मिनिटांची चुरशीची झुंज देत जोकोविचनं दुसरा सेट 7-6 नं जिंकला.

तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचनं मेदवेदेवचा 6-3 असा पराभव करत विजय मिळवला.

जोकोविच आणि मेदवेदेव यांच्यातील अंतिम सामना एकूण तीन तास 17 मिनिटं चालला.

जोकोविच आतापर्यंत 36 वेळा ग्लँडस्लॅम फायनल खेळला आहे. त्यापैकी 34 विजेतेपद त्यानं पटकावली आहेत.

यामध्ये तो 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आणि सात वेळा विम्बल्डन चॅम्पियन ठरलाय.

तर यूएस ओपनमधील जोकोविचचं हे चौथं जेतेपद ठरलंय