ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा 43 वर्षे आणि सहा महिने वयाचा टेनिसपटू रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

बोपण्णाने कॅनडाच्या डॅनियल नेस्टरचा विक्रम मोडला, जो 2016 ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना खेळला तेव्हा 43 वर्षे आणि चार महिन्यांचा होता.

रोहन बोपण्णाचा जन्म 4 मार्च 1980 रोजी बेंगळुरु इथे झाला. बोपण्णाने वयाच्या अकराव्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली.

रोहनला फुटबॉल आणि हॉकीमध्येही रस होता. पण वयाच्या एकोणिसाव्या वर्षी टेनिस हे त्याचं प्राधान्य बनलं.

रोहनचे वडील एमजी बोपण्णा हे कॉफी प्लांटर आहेत तर त्यांची आई मलिका बोपण्णा गृहिणी आहे. रोहनला एक मोठी बहीणही आहे जी मुंबईत राहते.

रोहन बोपण्णाने बंगळुरुमध्ये जैन विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या श्री भगवान महावीर जैन कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे.



रोहन बोपण्णाचे कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंग एकेरीमध्ये 213 (2007) आणि दुहेरीमध्ये 3 (2013) आहे.

रोहन बोपण्णाने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 24 विजेतेपदे जिंकली आहेत. रोहनचा आवडता खेळाडू स्टीफन एडबर्ग आहे.

रोहन बोपण्णाने 2012 मध्ये सुप्रिया अन्नियाशी लग्न केले. दोघांनी प्रेमविवाह केला आहे.