स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध भारताने जिंकला. आता दुसऱ्या सामन्यासाठी भारत सज्ज झाला आहे. भारतासमोर आता हाँगकाँगचा संघ असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. सर्वच खेळाडू सराव करताना दिसत आहेत. दरम्यान हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. यावेळी दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंत याला संधी मिळू शकते. तसंच गोलंदाजीत आवेश खानच्या जागी अष्टपैलू आश्विनला संधी मिळू शकते. भारत आणि हाँगकाँग यांच्यात पार पडणारा सामना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवला जाईल. भारताला पुढील फेरीत एन्ट्रीसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.