अरुण योगीराज हा कर्नाटकातील मैसूर शहरातील रहिवासी आहे.



प्रसिद्ध शिल्पकारांच्या कुटुंबातील तो आहे. त्यांच्या ५ पिढ्या मूर्ती कोरण्याचे काम करत आल्या आहेत.



अरुण हा देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकारांपैकी एक आहे.



देशातील विविध राज्यांमध्ये अरुणच्या कोरीव मूर्तींना मोठी मागणी आहे.



खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणच्या कलेचे कौतुक केले आहे.



एमबीए झाल्यानंतर त्यांनी काही काळ खासगी कंपनीत नोकरीही केली. मात्र, त्याच्यातील शिल्पकाराला तो फार काळ लपवू शकला नाही, याच कारणामुळे 2008 मध्ये त्यांनी शिल्पकलेची कारकीर्द सुरू केली.



इंडिया गेट येथील सुभाषचंद्र बोस यांचा 30 फूट उंच पुतळा अरुण योगीराज यांनी तयार केला आहे.



नेताजींच्या १२५व्या जयंतीपूर्वी पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाबद्दल इंडिया गेटवर पुतळा बसवण्याची इच्छा व्यक्त केली. अरुण योगीराज यांनी ३० फूट उंच पुतळा बनवून पंतप्रधान मोदींची ही इच्छा पूर्ण केली.



अरुण योगीराज यांनी केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांची १२ फूट उंचीची मूर्तीही बनवली.



मैसूर जिल्ह्यातील 21 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती, संविधान निर्माता डॉ. आंबेडकर यांचा 15 फूट उंच पुतळा, म्हैसूरच्या राजाची 14.5 फूट उंच पांढरी अमृतशीला मूर्ती बनवली. अशी इतर अनेक शिल्पे अरुण योगीराजांनी कोरलेली आहेत.