कोकणातील प्रसिद्ध अशा राजापूरच्या गंगामाईचं आगमन झालं आहे. गंगेचं आगमन हा नेहमी अभ्यासकांचा देखील विषय राहिला आहे. गंगामाई आल्यानंतर लाखो भाविक गंगा स्थळाला भेट देतात. मागील दहा दिवसांमध्ये हजारो भाविकांनी यावेळी गंगेत स्नान केलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशविदेशासह लाखो भाविक गंगेच्या आगमनानंतर दर्शन घेतात. आजच्या युगात देखील लाखो भाविकांची गंगामाईवरील भक्ती अढळ असल्याची प्रचिती इथं आल्यानंतर येते. राजापूरच्या उन्हाळे गावातून गंगातीर्थाकडे जाण्याचा रस्ता आहे. गंगातीर्थाच्या चिरेबंदी घाटावर गंगेची चौदा कुंडं असून गंगा येताच ही कुंडं भरुन वाहतात. गंगा प्रकट झाल्यावर राजापूरच्या गंगेला तीर्थक्षेत्राचे स्वरुप प्राप्त होतं.