बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या अदांची बात काही औरच... बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत दीपिकाचा समावेश होतो. दीपिका म्हणजे, बॉलिवूडची मस्तानी; लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोननं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या अदांनी धुमाकूळ घातलाय. गेल्या काही दिवसांपासून आपल्या क्लासी आणि हटके लूक्समुळे ती चर्चेत आहे. कान्समधील दीपिकाचे क्लासी लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत. दीपिकानं ब्लॅक अँड गोल्डन कलरचा गाऊन वेअर केलाय. ब्लॅक अँड गोल्डन फिश कट गाऊनमध्ये दीपिका पादुकोन अत्यंत ग्लॅमरस दिसतेय. दीपिकाच्या या गाऊनच्या दोन्ही बाजूंना शिमरी पफ लावला आहे. स्मोकी आय मेकअपमुळे दीपिकाचा लूक आणखी खुलून दिसतोय.