मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सर्वात आधी सैराट चित्रपटात झळकली. यातून नावारुपाला आलेली रिंकू नुकतीच झुंड चित्रपटात झळकली. रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे. सोशल मीडियावर सध्या ती चांगलीच अॅक्टिव्ह असते. नुकतीच ती झी मराठीच्या किचन कल्लाकार या शोमध्ये सहभागी झाली. या वेळी तिने काळ्या रंगाची साडी नेसली होती, सिम्पल मेकअप आणि साधा लूक तिच्यावर एकदम खास दिसतोय. सैराट चित्रपटामुळे रिंकूला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामध्ये रिंकूनं आर्ची ही भूमिका साकारली. चित्रपटामधील रिंकू आणि आकाशच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.