द्राक्षाचे नवीन वाण (New Grape Variety) विकसित



महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघानं केलं द्राक्षाचे नवीन वाण विकसित



पुण्यातील मांजरीच्या (Pune Manjari) फार्म प्रयोगशाळेत हे नवे द्राक्ष वाण विकसित



गेल्या तीन ते चार वर्षांपासून या वाणाच्या संशोधनाचं काम सुरु होतं



महाराष्ट्राच्या विविध भागात, वेगवेगळ्या भौगोलिक आणि वातावरण परिस्थितीत या वाणाची चाचणी



सर्व प्लॉट्सवर या वाणाबाबत समाधानकारक अभिप्राय



सुधारित वाणांच्या वापराने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात भरघोस वाढ होणार



विकसीत करण्यात आलेले नवीन वाण हे सुगंधी लाल रंगाचे आहे.



आकर्षक रंग आणि मधुर चवीच्या द्राक्षांना युरोप, चीन, मध्य-पूर्व आशियासह जगभरात मोठी मागणी असते.



नव्याने विकसित करण्यात आलेले वाण हे सध्याच्या क्रिमसन जातीपेक्षाही सुधारित आहे.