बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने एक मोठा निर्णय घेतला आहे. 2013 साली अनुष्काने ‘क्लीन स्लेट फिल्म्स’नावाचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले होते. अनुष्काने तिचा भाऊ कर्णेशसोबत हे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. अनुष्काने आता या प्रॉडक्शन हाऊसला रामराम केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुष्काने यासंदर्भात माहिती दिली आहे. या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत अनुष्काने ‘NH 10’,‘फिलौरी’, ‘परी’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच ‘पाताल लोक’ या वेब सीरिजचीदेखील निर्मिती केली आहे. अनुष्काचा‘चकदा एक्स्प्रेस’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.