अभिनेता सलमान खानशी संबंधित फोटो, जुने किस्से आणि व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असाता. सध्याही सलमानचा एक जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो स्क्रीन टेस्ट देत असल्याचे दिसत आहे. सलमान खानला बॉलिवूडचा दबंग, सुलतान अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. एक वेळ अशी होती की, तो इतर धडपडणाऱ्या अभिनेत्याप्रमाणे स्क्रीन टेस्ट द्यायला आला होता. त्या स्क्रीन टेस्टचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सलमान खानच्या हातात गिटार दिसत असून त्याने निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. व्हिडीओमध्ये सलमान खान स्पीकिंग अॅक्शनसोबत स्क्रीन टेस्ट देताना दिसत आहे. तो पुन्हा-पुन्हा कॅमेऱ्याकडे बघून त्याचे संवाद बोलत आहे. शिवाय सलमान खान खूपच तरुण दिसत असून त्याच्या चेहऱ्यावर निरागसपणा दिसत आहे. सलमानला असे पाहून चाहत्यांना जुने दिवस आठवल्याचे सोशल मीडियावर ते सांगतात. सलमान खानने 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर तो मैंने प्यार किया या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला.