भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीनं न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात आणखी एका विक्रमाला गवसणी घातलीय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 सामने खेळणारी झुलन दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. आयसीसी महिला विश्वचषकात यापूर्वी झुलन गोस्वामीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 घेण्याचा विक्रम रचला होता. झुलननं 6 जानेवारी 2002 रोजी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. 20 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिनं 350 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिनं एकदिवसीय सामन्यात 250 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिनं कसोटी क्रिकेटमध्ये 44 आणि टी-20 मध्ये 56 विकेट्स घेतल्या आहेत.