लाफ्टर क्विन भारती सिंह लवकरच आई होणार आहे. लवकरच भारतीच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. भारती आणि हर्ष लिंबाचिया लवकरच आई- बाबा होणार आहेत. भारती आणि हर्ष हे सध्या 'हुनरबाज: देश की शान' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. भारती लवकरच खतरा खतरा या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भारती सिंहचे जलपरीलूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आठव्या महिन्यातही भारती मन लाऊन काम करत आहे. भारती सेटवरदेखील अॅक्शन मोडमध्ये दिसते.