‘अनुपमा’ या मालिकेतून रुपाली गांगुली प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली आहे. तिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे. रुपालीने या शोद्वारे घरोघरी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रुपाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रुपाली तिच्या लूकवर सतत प्रयोग करत राहते. तिचा लूक अनुपमाच्या पात्रापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. सोशल मीडियावर रुपालीचा हा बदल पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. रुपाली दररोज ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट करत असते. नुकतेच रुपालीने ब्लू कलरच्या गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे. रुपाली या फोटोंमध्ये सर्व अभिनेत्रींना टक्कर देताना दिसत आहे. तिचा लूक पाहून सगळेच तिचे कौतुक करत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. रुपालीने ब्लू कलरच्या गाऊनसोबत हाय पोनीटेल बांधली असून, हेवी मेकअप केला आहे.