अंबानगरी अर्थात अमरावतीमध्ये पुष्पप्रेमींची संख्या काही कमी नाही.



घराच्या बागेत, गॅलरीत, गच्चीत, अगदी छोट्याश्या खिडकीतही अनेक मंडळी हौसेने फुलझाडे लावतात.

परंतु हा आनंद फक्त आपल्या घरच्या बगिच्यापुरता मर्यादित न राहता सर्व अमरावतीवासीयांना मिळावा या उद्देशाने या प्रदर्शनाचं आयोजन केलंय.

विश्वभारती पब्लिक स्कुलच्या प्रांगणात अमरावती गार्डन क्लबच्या वतीने प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.



ही पुष्पप्रदर्शनासह एक स्पर्धा असल्याचं आयोजक सांगतात.

यात अँडेनियम, सिझनल फ्लॉवर्स, कॅकटस, सक्युलँट, बोन्साय, प्लांटस ऑन मॉस स्टीक, फोलिएज, हँगिंग बास्केट यासह विविध गटांचा समावेश आहे.

अमरावतीच्या इर्विन चौकातील विश्व भारती पब्लिक स्कूल परिसरात हे प्रदर्शन आहे.



काल 19 आणि आज 20 फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.



या प्रदर्शनाला नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.



प्रदर्शनातील विविध जातीचे फुलं बघताक्षणीच सर्वांचे मन मोहून घेतात.