अभिनेत्री कियारा अडवाणी नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. कियाराने अभिनेता सिद्धार्त मल्होत्रासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर कियाराने अनेकवेळा तिचे फोटो शेअर केले आहेत. अलीकडचेच कियाराने ऑरेंज रंगाच्या ब्रालेट-स्कर्टमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. कियाराच्या या ब्रालेट-स्कर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. महागडा ब्रालेट-स्कर्ट परिधान करून कियाराने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ब्रालेटवर पुढे लांब अशी चेन आहे. कियाराचा हा आऊटफिट ऑस्ट्रेलियन ब्रांड डायॉन ली यांनी डिझाइन केला आहे. कियाराचा हा ब्रालेट तब्बल 57 रजार रूपयांपेक्षा जास्त किमतीचा आहे. कियाराच्या टू साईट ओपन स्लिट स्कर्टची किंमत 71 हजार रूपयांपेक्षा जास्त आहे.