अनन्या पांडेचा 'लिगर' हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. सध्या अनन्या विजय देवरकोंडासोबत चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. अनन्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजकाल अनन्या पांडे तिच्या आगामी 'लिगर' या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विजय देवरकोंडा दिसणार आहे. अनन्या पांडेने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा तिचा एक लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती शॉर्ट स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये पोज देताना दिसत आहे. लिगरच्या प्रमोशनदरम्यान अनन्या पांडेचे एकापेक्षा एक लूक समोर येत आहेत. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. अनन्या पांडे लीगर या चित्रपटातून साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.