Redmi कंपनीचे बजेट फोनपासून प्रीमियम सेगमेंटमध्ये अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. Redmi चा स्वस्त स्मार्टफोन आणि त्यावर मिळणाऱ्या डिस्काऊंटबाबत जाणून घेऊया.

Redmi 12C हा बजेट स्मार्टफोन आहे. अॅमेझॉनवरुन हा स्मार्टफोन आणखी स्वस्त किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या फोनची नवी किंमत, डिस्काऊंट आणि स्पेसिफिकेशनबाबत जाणून घेऊया.

Redmi 12C किंमत 8499 रुपये आहे. या किंमतीत फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोअरेज मिळतो. Amazon वर लिस्टेड या फोनवर डिस्काऊंट देखील मिळत आहे.

Redmi 12C स्मार्टफोनवर 800 रुपयांचं व्हाऊचर वापरण्याची संधी मिळत आहे. याशिवाय अतिरिक्त 1500 रुपयांचा कॅशबॅक ऑफर देखील आहे, यासाठी Amazon Pay, ICICI कार्डचा वापर करावा लागेल.

Redmi 12C या स्मार्टफोनमध्ये 6.71 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. लिस्टेड माहितीनुसार, यामध्ये स्क्रॅच रेझिस्टंट ग्लास आहे. 500Nits चा पीक ब्राईटनेस मिळेल.

Redmi 12C मध्ये Media Tek Helio G85 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. या फोनमध्ये युझर्सना 4GB रॅमसह 3GB (Virtual RAM) ही मिळत आहे. यामध्ये 64GB इंटरनल स्टोअरेज मिळेल.

Redmi 12C या फोनच्या बॅक पॅनलवर ड्यूएल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा ड्यूएल कॅमेरा सेन्सर आहे. यामध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा ाहे, ज्यात f/2.2 चा अपर्चर दिला आहे.

या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी आहे. याच्यासोबक 10W चा स्टॅण्डर्ड चार्जर मिळेल. यात 3.5 ऑडिओ जॅक आहे. यात बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

Redmi 12C हा स्मार्टफोन मॅट ब्लॅक, रॉयल ब्लू, मिंट ग्रीन आणि लॅवेण्डर पर्पल या चार कलर व्हेरिएंटमध्ये मिळत आहे.