अभिनेत्री अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच अमृतानं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हाईट टी-टॉप, ब्यु डेनिम आणि प्रिंटेड जॅकेट अशा लूकमधील फोटो अमृतानं शेअर केले. अमृतानं गळ्यात काही सिल्वर ज्वेलरी देखील घातलेल्या दिसत आहे. अमृताच्या या हटके लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. अमृताच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अमृता ही मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. अमृताच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अमृताच्या चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अमृता तिच्या अभिनयानं आणि नृत्यानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.