बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी आगामी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले होते. अमिताभ बच्चन यांनी आता सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, माझ्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद... अमिताभ पुढे म्हणाले,आता माझी तब्येत ठीक असून लवकरच याच जोशात मी पुन्हा रॅम्पवर येईन, अशी आशा आहे. बिग बी लवकरच शूटिंगला सुरुवात करणार असल्याने चाहतेदेखील उत्सुक आहेत. अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या सिनेमाचं शूटिंग हैदराबादमध्ये करत होते. शूटिंगदरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केली. अमिताभ बच्चन यांचा 'प्रोजेक्ट के' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.