बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या अडचणीत वाढ झाली आहे. रवीनाने नुकतीच ताडोबाची सैर केली आहे. रवीनाने सफारीदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रवीनाने नियमांचं पालन न केल्याने तिची चौकशी होणार आहे. रवीनाला अभिनयासोबत वाइल्डलाइफ फोटोग्राफीचीदेखील आवड आहे. रवीना अनेकदा जंगलसफरी करताना दिसून येते. जंगलसफरीदरम्यान यावेळी रवीना नियमांचं उल्लंघन करत वाघाच्या अधिक जवळ जाताना दिसून आली. वाघाचा फोटो काढण्यासाठी रवीना वाघाच्या अगदी जवळ जाऊन थांबली होती. ताडोबाआधी रवीनाने भोपाळमधील वन विहार राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली होती. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.