सध्या अभिनेत्री अर्चना पूरन सिंह 'द कपिल शर्मा शो' मधून प्रेक्षकांच्या भेटीस येते.
अर्चना पूरन सिंह ही 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाचं परीक्षण करते.
अर्चना ही विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
अर्चनानं नुकताच एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
या फोटोवर एका नेटकऱ्यानं कमेंट करुन तिला ट्रोल केलं. या ट्रोलरला अर्चनानं सडेतोड उत्तर दिलं आहे.
अर्चना पूरन सिंहनं तिचा पती आणि अभिनेता परमीत सेठीसोबतचा एक थ्रोबॅक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला.
हा फोटो शेअर करुन अर्चनाने कॅप्शनमध्ये लिहिलं, गुगल आम्हाला आठवण करून देत आहे की, आमचे आयुष्य किती चांगले आहे..
अर्चनानं शेअर केलेल्या या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'महिलेसारखी कमी तर पुरुषासारखी जास्त दिसतेस कपिलचे म्हणणे अगदी बरोबर आहे की तुझे रूप बदलण्यास खूप वेळ लागत असेल.'
अर्चनानं नेटकऱ्याच्या या कमेंटला रिप्लाय दिला, 'एवढ्या लहान वयात तुझी किती वाईट विचारसरणी आहे.तू जर शिक्षण घेतलं असतं तर कदाचित आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी कसं बोलावं हे कळलं असतं. प्लिज प्रत्येक वयाच्या, शेप आणि साइजच्या महिलांचा आदर करायला शिका. तुम्ही स्वतःच स्त्रीचा आदर करत नाही आणि पुरुषांकडून आदराची अपेक्षा करता.'
1992 मध्ये अर्चना आणि परमीत सेठी यांनी लग्न केलं. दोघांनी मंदिरात गुपचूप लग्न केले होते. हे दोघे आर्यमन आणि आयुष्मान या दोन मुलांचे पालक आहेत.