बॉलिवूड अभिनेत्री सना खान आज (21 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे.



कधी ब्रेकअप तर कधी निकाह, अनेक कारणांमुळे सन खान नेहमीच चर्चेत राहिली आहे.



सलमान खानसोबत 'जय हो' चित्रपटात सना खान दिसली होती. याशिवाय तिने ‘स्पेशल ऑपरेशन’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका केली होती.



मात्र, नंतर सना खानने अचानक लग्न केले आणि बॉलिवूड विश्वाला अलविदा केला. लग्न करत स्वतः तिनेच आपले करिअर सोडण्याचा निर्णय घेतला होता.



सना खानने 2005 मध्ये 'ये है हाय सोसायटी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने अभिनय विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.



'बॉम्बे टू गोवा', 'धन धना धन गोल' या चित्रपटांमध्ये तिने विशेष भूमिका केल्या. यानंतर तिने साऊथ इंडस्ट्रीतही आपला प्रवास सुरू केला. ती सलमान खानसोबत 'जय हो' चित्रपटात दिसली होती.



यानंतर त्यांनी 'वजाह तुम हो' आणि 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात देखील ती झळकली. सलमान खानमुळे सना खानचे नशीब चमकवले होते.



‘बिग बॉस सीझन 6’मध्ये सना खान एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या पर्वात ती सलमान खानची आवडती स्पर्धक बनली होती. सना खानने तिच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली.



मुफ्ती अनससोबत अचानक लग्न करून सना खानने लाखो चाहत्यांची हृदये तोडली. सना खानने लग्नाआधीच मनोरंजन क्षेत्र सोडण्याची घोषणा केली होती.



अल्लाहने दाखवलेल्या मार्गावर आता चालणार असल्याचे तिने म्हटले होते. वेब सीरिज ‘स्पेशल ऑप्स’ हा तिचा शेवटचा प्रोजेक्ट होता.