उद्योगपती अंबानी कुटुंब हे देशातीलच नाहीतर जगातील सर्वात प्रसिद्ध कुटुंब आहे.

उद्योगपती अंबानी कुटुंब हे देशातीलच नाहीतर जगातील सर्वात प्रसिद्ध कुटुंब आहे.

दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी शून्यातून सुरुवात केली आणि अंबानी कुटुंबाच्या व्यवसायाचा पाया घातला.



अंबानी कुटुंबातील लोकांचं किती शिक्षण झालं आहे हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या...



मुकेश अंबानी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईतून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे.



पुढे ते MBA करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. पण त्यानंतर 1980 मध्ये त्यांना रिलायन्स कंपनीसाठी परत भारतात यावं लागलं, त्यामुळे त्यांनी एमबीएचं शिक्षण अर्धवट सोडलं.



नीता अंबानी यांचं प्राथमिक शिक्षण रोज मॅनर गार्डनमधून झालं आहे. त्यांनी पुढील शिक्षण मुंबईच्या नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पूर्ण केलं आहे.



मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने साऊथ एशियन स्टडीज आणि सायकोलॉजीमध्ये पदवी शिक्षण घेतलं आहे. यानंतर, 2014 पासून, तिने रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ कंपनीचं काम हाताळण्यास सुरुवात केली.



मुकेश अंबानी यांच्या मोठा मुलगा आकाश अंबानीने आयबी डिप्लोमा प्रोग्राम पूर्ण केला. त्यानंतर 2013 मध्ये ब्राउन युनिव्हर्सिटी, यूएसए मधून बिझनेस-कॉमर्समध्ये पदवी शिक्षण घेतलं.



आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहतानं प्रिन्सटन युनिव्हर्सिटी, न्यू जर्सी, यूएसएमधून Anthropology पदवी शिक्षण घेतलं आहे. याशिवाय तिला समाजकार्य करायला खूप आवडतं.



अनंत अंबानीने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर र्‍होड आयलंडमधील ब्राऊन विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलं.



अंबानी यांची धाकटी सून राधिका मर्चंटने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूल आणि बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून केलं. यानंतर तिनं 2017 मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेतली.