भोपळ्याच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. भोपळ्याच्या बियांमध्ये कॅल्शियम आढळते, ज्यामुळे हाडे निरोगी राहण्यास मदत होते. तसेच हाडांशी संबंधित आजार होण्यापासून रोखतात. भोपळ्याच्या बिया चयापचय वाढवतात.त्या हळूहळू पचतात. त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही तणावाचा सामना करत असाल तर भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश करावा. कारण त्यामध्ये ट्रायप्टोफॅन अमिनो अॅसिड आढळते. भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक खनिजे आढळतात. जसे मॅंगनीज, तांबे, जस्त आणि फॉस्फरस जे रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. भोपळ्याच्या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरतात. भोपळ्याच्या बिया इन्सुलिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने केसांना खूप फायदा होतो. यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे केसांची वाढ वाढवण्यास मदत करतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.