लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. अनेक जणांना लिंबू सलाडमध्ये, जेवणात लिंबू खायला आवडते.



लिंबाच्या जास्त वापरामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.



सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. पण याचं अतिसेवन आरोग्याला हानी पोहोचवू शकते.



लिंबाच्या अतिसेवनामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात तसेच त्याचा तुमच्या पचनावरही वाईट परिणाम होतो.



जर तुम्ही आहारात लिंबाचा जास्त वापर करत असाल तर त्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.



यामुळे तुमच्या शरीराचे नुकसान होऊ शकते. आणि तुम्हाला थकवाही जाणवू शकतो.



लिंबू आम्लयुक्त असल्यामुळे दातांच्या समस्या होऊ शकतात. पुढे जाऊन ही समस्या आणखी वाढू शकते.