विविध देशाच्या विविध भागांत एकापेक्षा एक चवीचे खाद्यपदार्थ आहेत, जे आवडीने खाल्लेही जातात.



अशातच ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने (Swiggy) शुक्रवारी उघड केले की भारतीयांनी गेल्या 12 महिन्यांत 7.6 कोटी बिर्याणी ऑर्डर केल्या.



या ऑर्डरमध्ये ग्राहकांनी चवदार कोलकाता बिर्याणी पासून सुगंधित मलबार बिर्याणी, हैदराबादी दम बिर्याणी पर्यंत ऑर्डर केल्या होत्या.



2022 च्या तुलनेत मागील साडेपाच महिन्यांत बिर्याणीच्या ऑर्डरमध्ये तब्बल 8.26 टक्क्यांची वाढ झाली आहे.



देशभरातील 2.6 लाखांहून अधिक रेस्टॉरंट्स स्विगीच्या माध्यमातून बिर्याणी देतात, तर 28,000 हजाराहून अधिक रेस्टॉरंट्स केवळ बिर्याणी बनवण्यात तरबेज आहेत.



ज्या शहरांनी सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली त्या शहरांमध्ये पहिला क्रमांक बेंगळुरुचा आहे. बेंगळुरूने जवळपास 24,000 बिर्याणी सेवा देणार्‍या रेस्टॉरंटसह आघाडी घेतली.



त्यानंतर 22,000 हून अधिक मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि 20,000 हून अधिक रेस्टॉरंट्ससह दिल्लीने आघाडी घेतली आहे.