पावसाळा आला की आपल्याला बाहेर फिरायला जाण्याचे वेध लागतात. आपली पाऊलं घराबाहेर पडतात. पण, फिरण्यासाठी जायचं नेमकं कुठे? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यासाठी तुम्ही काही पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता. पुणे-मुंबई महामार्गावर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर असलेलं लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहे. पावसाळ्यात माथेरानमध्ये ट्रेकिंग करण्याची आणि तिथलं वन सौंदर्य पाहण्याची मज्जाच वेगळी असते. माळशेज घाटाचं निसर्ग सौंदर्य हे पावसाळ्याच्या दिवसांत आणखी खुलतं. रस्त्यालगत धबधबे, हिरव्यागार पर्वतरांगा आणि थंड वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर इगतपुरी हे एक उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात भीमाशंकरला भेट दिल्यास येथील आल्हाददायक निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आनंद घेता येतो. आंबोली घाटातील वातावरण थंड, शांत आणि प्रसन्न असतं.