देशातील कोरोना संसर्गात काहीशी घट झाली आहे सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 528 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे सोमवारी दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी देशात 16 हजार 935 नवीन रुग्णांची नोंद आणि 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्याआधी सलग चार दिवस वीस हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती सोमवारी दिवसभरात महाराष्ट्रात 1111 नव्या रुग्णांची भर पडली आहे गेल्या 24 तासांत एकूण 1474 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे सोमवारी मुंबईत सर्वाधिक म्हणजे 176 रुग्णांची भर पडली आहे