दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचे जगभरात चाहते आहेत. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा अल्लू अर्जुन चर्चेत आला आहे. सध्या अल्लू अर्जुन तंबाखूच्या जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुनने तंबाखूची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. अल्लू अर्जुनने पैशाचा विचार न करता जनतेच्या हिताचा विचार केला आहे. अल्लू अर्जुन तंबाखू सारख्या कोणत्याही गोष्टीचे सेवन करत नाही. अल्लू अर्जुन चाहत्यांची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेत असतो.