बॉलिवूड बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांना देखील प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. दाक्षिणात्य चित्रपटातील अॅक्शन सिन्स आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 50 कोटींची कमाई केली. फक्त तमिळनाडूमध्येच या चित्रपटाने 4.06 कोटी कमावले. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने ओपनिंग डेला तेलंगणामध्ये 11 कोटींची कमाई केली. चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'पुष्पा: द राइज' हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे.