आपल्या सुरेल आवाजाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूडची लोकप्रिय गायिका अलका याज्ञिक यांचा आज 56 वा वाढदिवस साजरा आहे



अलका याज्ञिक यांनी गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक गाणी आपल्या आवाजात दिली आहेत



अलका यांचा जन्म 20 मार्च 1966 रोजी कोलकाता येथे झाला



अलका या मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांनी आई शुभा याज्ञिक यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकले आणि लहान वयातच गायला सुरुवात केली



वयाच्या सहाव्या वर्षी अलका याज्ञिक यांनी पहिले गाणे गायले होते



वयाच्या 10 व्या वर्षी अलका आपल्या आईसोबत मुंबईत आल्या आणि चित्रपट निर्माता राज कपूर यांची भेट घेतली. राज कपूर यांना त्यांचा आवाज आवडला आणि त्यांनी त्यांची लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याशी ओळख करून दिली.



त्यानंतर वयाच्या 14 व्या वर्षी अलका यांनी 'पायल की झंकार' चित्रपटामधील 'थिरकट अंग लचक झुकी' हे गाणे गायले



अलका यांनी 1989 मध्ये शिलाँगमधील बिझनेसमन नीरज कपूरसोबत लग्न केले. लग्न होऊनही ती गेल्या 27 वर्षांपासून त्या पतीपासून वेगळी राहत आहेत.



पण गंमत म्हणजे लग्नानंतर दूर राहण्याचं कारण भांडण नसून दोघांचं काम आहे. अलका आणि नीरज यांच्यात दूर असूनही खूप चांगले संबंध आहेत.