अभिनेता रणबीर कपूरच्या शमशेरा चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक निर्मात्यांनी आज शेअर केला आहे. या लूकमध्ये रणबीर लांब केस आणि दाढीसह खूपच धोकादायक दिसत आहे. रणबीरचा नवा लूक प्रेक्षकांना खूप आवडला आहे. रणबीरची पत्नी अभिनेत्री आलियाला देखील पतीचा हा लूक खूपच आवडला आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील रणबीर आणि आलियाची रोमँटिक जोडी लोकांच्या पसंतीस उतरली आहे. केवळ चाहतेच नाही तर रणबीर कपूरची पत्नी म्हणजेच आलिया भट्टही शमशेराबद्दल खूप उत्सुक दिसत आहे. अलीकडेच आलियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शमशेराचे हे पोस्टर पोस्ट केले आहे. पोस्टमध्ये आलियाने लिहिले आहे की या पोस्टरने त्यांची सकाळ हॉट केली आहे.