अभिनेत्री राखी विजान (Rakhi Vijan) ही दया ही भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती.



राखीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.



राखी विजाननं तिचा आणि दिशा वकानीचा फोटो असलेल्या एका बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.



पोस्टमध्ये राखीनं लिहिलं, 'ही अफवा आहे. मी हे ऐकून थक्क झाले होते. मला मालिकेच्या प्रोड्यूसरकडून किंवा चॅनलकडून अजून कोणीही अप्रोच केलं नाही. '



राखी विजानच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं.



' 90 च्या दशकातील हिट मालिका 'हम पांच' मधील ‘स्वीटी माथूर’या भूमिकेमुळे राखी विजानला विशेष लोकप्रियता मिळाली.



राखी विजान ही सोशल मीडियावर सक्रिय असते.



वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.



राखी विजाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानं आता दया ही भूमिका कोण साकारणर? हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.



राखी विजानच्या सोशल मीडियावर पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.