बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे. आलियाच्या लिव्हिंग रुममधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आलियाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला होता. आलियाने संताप व्यक्त करत लिहिलं आहे,मी माझ्या घरी लिव्हिंग रुममध्ये बसले होते. त्यावेळी कोणीतरी मला पाहतयं असं मला जाणवलं. आलिया पुढे म्हणाली,समोरच्या इमारतीच्या गच्चीवरुन फोटाग्राफर माझे फोटो काढत होते. एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणं किती योग्य आहे? आलियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. पोलिसांनी आलियाशी संपर्क साधला असून तिला तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. आलियाच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहतेदेखील आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत. आलिया भट्टचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लिव्हिंग रुममधील आलियाचे फोटो लीक झाल्याने आता अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ झाली आहे.